लातूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूर शहराच्या वतीने रविवार (दि.१३) रोजी सायंकाळी ५ वाजता विजयादशमीनिमित्त पथसंचलन काढण्यात आले. शहरातील खडक हनुमान परिसरातील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातील क्रीडा संकुलपासून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास संचलनाला सुरुवात झाली. तेथून दयाराम रोड मार्गे सुभाष चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, हत्ते कॉर्नर, रत्नापूर चौक मार्गे परत गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयातील क्रीडा संकुलात पोहोचल्यावर सांगता झाली. संचलन मार्गात अनेक नागरिकांनी संचलनावर पुष्पवृष्टी केली तसेच मार्गावरही माता भगिनींनी ही पुष्पवृष्टी केली. शहरात खुप जल्लोषात. या संचलनाचे स्वागत शहरातील नागरीकांनी केले शहरात उत्साहाचे वातावरण होते खुप मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संचलनाच्या मार्गावर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता. या संचलनास विभाग संघचालक संजय अग्रवाल, जिल्हा संघचालक राजेश्वर बेंबडे, नगर संघचालक उमाकांत मद्रेवार यांच्यासह जवळपास ८४७ स्वयंसेवक पुर्ण गणवेशात उपस्थित होते.
पुढची पिढी सज्ज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर वर्षात पदार्पण केल्याने यंदाच्या संघाच्या संचलनाला विशेष महत्व आहे. राष्ट्रभक्त युवा पिढी घडविण्यासाठी, योग्य संस्कार देण्यासाठी, अनुशासन शिकवण्यासाठी संघाने कठोर परिश्रम घेतले आहेत. याप्रसंगी बालवयातील स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.