लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ५८ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; संपूर्ण यादी पहा

उदगीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी सोहेल शेख यांची नियुक्ती

7 Min Read

लातूर : महाराष्ट्र पोलिस दलातील ५८ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांची गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी जि. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पदी बदली करण्यात आली आहे. तर मनमाड जि. नाशिक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांची उदगीरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून शुक्रवारी (ता. २) राज्यातील ५८ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

राज्यातील ५८ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राजेंद्र धैर्यशील शेळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे),
किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी (उपविभागीय पोलीस अधिकारी,सातारा शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण),
संध्या बुधाजी गावडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई),
सुनिल त्रंबक भामरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई),
मल्लिकार्जुन प्रल्हादराव इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल, जि. चंद्रपूर ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर),
चंद्रसेन जगदेवराव देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर, जि. नांदेड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी ग्रामीण),
संदीप बाबुराव मिटके (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर),
संजय गंगाराम पुजलवार (पोलीस उप अधीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ),
संतोष शिवाजी वाळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, बीड),
संजय रतन बांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण ते पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर),
प्रशांत बाबासाहेब ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, गणेशपुरी, ठाणे ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर, पुणे ग्रामीण),
यशवंत नामदेव गवारी (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर),
शैलेश बाबुराव काळे (उपविभागीय पोलीस अधिकारी,
जव्हार, जि. पालघर ते उपविभागीय पोलीस अधिकारी,रोहा, जि. रायगड),
सोनाली तुकाराम कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी,रोहा, जि. रायगड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, जि. रत्नागिरी),
अरुण रखमाजी भोर (उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि. रायगड ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई),
विनितकुमार जयवंत चौधरी (उपविभागीय पोलीस अधिकारी,
रत्नागिरी ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि. रायगड),
मारोती ज्ञानोजी थोरात (उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार, जि. नांदेड, ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, हिंगोली),
पुंडलिक नामदेवराव भाटकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, कामठी, नागपूर ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, नागपूर ग्रामीण),
सचिन्द्र भाऊराव शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे, अमरावती ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण),
मयूर सिद्राम भुजबळ (उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंडरी, जि. गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी,
सातारा शहर, जि. सातारा),
सुदर्शन साईदास राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती, पुणे ग्रामीण),
नितीन भागवत गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव ग्रामीण),
सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर (उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर, जि. कोल्हापूर),
बापुराव बिरा दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण),
संकेत नथुराम देवळेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण),
सुभाष रमेश दुधगांवकर (पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई),
जयदत्त बबन भवर (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर),
गणेश प्रवीण इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती, ते उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड ग्रामीण),
संकेत सतीश गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर, जि. कोल्हापूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलूर, जि. नांदेड),
अमोल रामदत्त भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर),
देविदास काशिनाथ घेवारे (अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड),
नारायण देवदास शिरगांवकर (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज, सोलापूर ग्रामीण),
ब्रम्हदेव वासुदेव गावडे (अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर),
विश्वांभर भीमराव गोल्डे (विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, यांचे वाचक ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड),
अनंत महिपतराव कुलकर्णी (अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना),
राजेंद्र श्रीरंग शिरतोडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई),
सिद्धार्थ वसंतराव गाडे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते दक्षता अधिकारी, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई),
हनुमंत अमृतराव गायकवाड (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर (रुजू नाहीत) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड, जि. यवतमाळ),
प्रदीप दौलतसिंग पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड, जि. यवतमाळ ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, जि.वाशिम),
जगदीश रामराव पांडे (उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा, जि.वाशिम ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंडरी, जि. गडचिरोली),
सचिन बापु सांगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी जालना ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर),
दत्तात्रय भगवंतराव पाबळे (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर),
सुधीर भीमसिंग पाटील (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर (रुजू नाहीत), ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा, जि.बुलढाणा),
साहिल उमाकांत झरकर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल, जि. चंद्रपूर),
पद्मावती शिवाजी कदम (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे),
संजीव बाळकृष्ण पिंपळे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा, पालघर),
विवेक एकनाथ लावंड (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा)
महेश मोहनराव तरडे (सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे),
पुष्कराज गोविंदराव सूर्यवंशी (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव ग्रामीण, नाशिक ग्रा. ते उपविभागीय पोलीस अधिकारी, माणगांव, जि. रायगड),
सुधाकर पोपट यादव (पोलीस उप अधीक्षक,महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर),
सुधीर पुंडलिक नंदनवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर ते सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर),
निलेश सुरेश माईणकर (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, रत्नागिरी ते उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी),
संतोष बाबुराव गायकवाड (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कामठी, नागपूर ग्रामीण),
सदाशिव गोविंद शेलार (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव ते उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा, जि. धाराशिव),
रमेश सुदाम बरकते (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा, धाराशिव ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे, जि. अमरावती),
अनिल तुकाराम घेरडीकर (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे ) यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!