|मुखपत्र दक्षता वृत्तांत
अकोला : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रामदास पेठ पोलीस ठाणे हददीतील कागजी पुरा वच मोमीन पुरा भागात नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तली करीता घेवुन येणारा दोन चार चाकी मालवाहू वाहणे पकडुन त्या मध्ये २५ गोवंश जातीचे जनावरे, गोवंश वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली दोन चार चाकी मालवाहू वाहने असा एकूण १९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नामे मोहम्मद सुफीयान मोहम्मद नासीर वय २१ वर्ष खडकपुरा जुनी वस्ती मुर्तीजापुर जि.अकोला यास पुढील तपास कामी पो स्टे रामदास पेठ यांचे ताब्यात देण्यात आले तसेच नमुद गोवंश हयांना पुढील संगोपणाकरीता आदर्श गौशाळा म्हैसपुर, अकोला येथे ठेवण्यात आले आहे. २०२४ या चालु वर्षी ४० दिवसात एकुण १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकुण ५९ गोवंशांना जिवदान देण्यात आले. तसेच २०२३ मध्ये एकुण २१९ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ६३७ गोवंश जनावरांना जिवदान देवुन मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, फिरोज खान, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, गोकुल चव्हाण, रवि खंडारे, अब्दुल माजीद, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, अवीनाश पाचपोर, महेद्र मलीये, शेख वसीमोददीन, इजाज अहमद, लीलाधर खंडारे, मो. अमिर, अमोल दिपके, स्वप्नील खेडकर यांनी केली.