| मुखपत्र दक्षता वृत्तांत
सांगली : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार करणाऱ्याना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडुन ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास १) गणेश हणमंत पवार वय-२० वर्षे रा. अचुतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली २) सुखदेव अशोक पवार वय-२६ वर्षे रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली यांनी वडर गल्ली व मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर फिर्यादी जावेद गुलाब जमादार यय-३५ वर्षे रा. हेरीकुडी ता.चिकोडी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवुन त्यांना मार्केटयार्ड येथे थांबवून खिशातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण करून निघुन गेले होते. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ४४/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३९२, ३२३,५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या. सुचनांचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा वडर गल्ली येथे येणार असल्याची बातमी मिळाली तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच सदर ठिकाणी सापळा रचुन गुन्हयातील आरोपी यांना अटक केली व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे जबरी चोरी केल्याचे कबुल केले असुन त्याचेकडून ४०,०००/- रू. किंमतीची एक स्प्लेंडर मोटारसायकल जु.वा. किं.सु., २) ४,०००/- रू. रोख रक्कम, ३) १५,०००/- रू. किंमतीचा एक रियलमी कंपनीचा मोबाईल जु.वा.किं.सु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव याचे मार्गदर्शानाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मारूती साळुंखे, पोलीस अंमलदार महादेव घेरडे, संदिप साळुंखे, संदिप घस्ते, महमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, सायबर पोलीस ठाणे कडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली. सदर गुन्हयाचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे करीत आहेत.