शिवशाही ग्रुपचा स्तुत्य उपक्रम ; तब्बल २०० अनाथ मुलांना अन्नपदार्थांचे किट वाटप

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. शिवशाही ग्रुप , महाराष्ट्र राज्य, लातूर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गोकुळ बाल सदन येथे अनाथ मुलांना व माझं घर येथील अनाथ मुलांना आणि संत बापू देव साधू निवास मतिमंद विद्यालय येथे अन्नदान करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, संस्थापक अध्यक्ष चैतन्य फिस्के, सं.सचिव विजय महाजन, प्रमुख ऋषिकेश क्षीरसागर, श्याम गुंजोटे, सुधीर कुलकर्णी, अभिषेक रेड्डी, शैलेश साखरे, दीपक राठोड अजय पिडगे ,ऋतिक शिंदे, भगवेश्वर धनगर, विक्रम शिंदे, महेश बावगे, श्रेयस मुंडलीक, अभिषेक जंगम, मल्लिकार्जुन टोण्णे,अविनाश पाटील,विजय पवार, अक्षय शिंदे पाटील, शुभम जाधव ,अरविंद शेळके, ओम उटगे, श्याम खंडागळे, अखिलेश स्वामी, सुदर्शन पवार, किवडे लिंगराज, विशाल कांबळे, प्रेम घोलप आदी उपस्थित होते. जिद्दीला कार्याचे बळ मिळाले तर काय साध्य होत, हे शिवशाही ग्रुपच्या युवकांनी आज दाखवून दिले आहे. त्यांच्या या अन्नवाटपाच्या कार्यामुळे अनेक लोकं त्यांना आशीर्वाद देत आहेत. अन्नदाता सुखी भवं, ही म्हण खऱ्या अर्थाने या युवकांना लागू होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!