| मुखपत्र दक्षता वृत्तांत
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), गुप्तचर विभाग (आयबी), राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) संचालकांना जशी नियुक्तीनंतर दोन वर्षांचा कालावधी मिळतो, तसा तो आपल्यालाही मिळावा अशी मागणी पत्राद्वारे १८ जानेवारी रोजी शासनाकडे केली होती. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ शक्यता वर्तविण्यात येत होती. शुक्ला यांना दोन वर्षांचा कालावधी लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे आता शुक्ला या ३ जानेवारी २०२६ पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक राहतील. निवृत्तीला सहा महिने असताना दोन वर्षांचा कालावधी मिळविणाऱ्या शुक्ला या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. शुक्ला या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सहा महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी, असे निकष केंद्रीय लोकसेवा आयोगाने निश्चित केले असतानाही या मुदतीपेक्षा कमी कालावधी मिळणाऱ्या शुक्ला यांची शासनाने नियुक्ती केली. ही बाब ताजी असतानाच आता शुक्ला यांना थेट दोन वर्षांचा कालावधी देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.