| मुखपत्र दक्षता वृत्तांत
उदगीर : तालुक्यातील मौजे बोरताळ तांडा येथे पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर धाड टाकून २९ हजारांचा मुद्देमाल नष्ट करुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध हातभट्टी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांचे फिर्यादीवरुन नामे सुरेश भोजाराम पवार रा. बोरताळ तांडा ता उदगीर जि. लातुर याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक सोहेल शेख यांचे मार्गदर्शनाखाली वाचक पोउपनि कुलकर्णी, पोलीस अंमलदार बिरादार, धुळशेट्टे, गायकवाड, जगताप आरसीपी इनचार्ज पोउपनि चौधरी व आरसीपी प्लाटुन यांनी केली आहे.