२ घरफोड्या उघड; ६ दिवसांत गांधी चौक पोलिसांनी लावला छडा

2 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातू: शहरातील स्क्रॅप मार्केट रोडवर ३ मार्च रोजी रात्री एका दुकानातला ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. ही घरफोडी सहाव्या दिवशी उघडकीस आणण्यात गांधी चौक पोलिसांना यश आले आहे. यासोबत आणखीन एक अशा दोन घरफोड्या गांधी चौक पोलिसांनी उघड केल्या आहेत. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान टाकले होते. असे असताना पोलिस प्रशासनास चोरट्यांना पकडण्यात यश आले असून 1)गौस मुस्तफा सय्यद, वय 26 वर्षे रा. बौध्दनगर, लातुर, 2)आसीफ जावेद पठाण रा. आनंद नगर, लातूर या दोन संशयितांकडून एक लोखंडी तलवार व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. घरफोडी झाल्याच्या रात्रीच पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अखेर त्यांना यश आले आहे. सदर संशयित हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, राम गवारे, दतात्रय शिंदे, रणविर देशमुख, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांनी केलेली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!