रावेत येथे जागतिक महिला दिन साजरा

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

चिंचवड / सुनिल कांबळे : येथील स्व.श्री बाजीराव बाबुराव भोंडवे पाटील विरंगुळा केंद्र, घोरावडेश्वर युवा मंच आणि घोरावडेश्वर महिला मंच रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     या कार्यक्रमाला केंद्रीय वस्तू, सेवा कर आणि सीमा शुल्क अधीक्षक सुवर्णा अथणीकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिक्षा सावखेडकर-पाटील, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा मरळ मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी विरंगुळा केंद्राचे संस्थापक सुरेश भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव काळभोर, युवा नेते दिपक भोंडवे, पिंपरी चिंचवड शिवसेना शहराध्यक्ष निलेश तरस, संस्थेचे अध्यक्ष भीमराव निकम, महिला मंडळाचे प्रमुख देशमुख मॅडम, युवा विभागाचे प्रमुख प्रकाश पवार व इतर सर्व सहकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

  या कार्यक्रमा दरम्यान केंद्राच्या महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम कथा पठन, कविता वाचन तसेच बालकलाकारांनी स्त्री-भ्रूण हत्या या विषयावर नाटक सादर केले. तसेच सर्व उपस्थित स्त्रियांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात घेतलेली उंच भरारी व स्त्रीशक्ती विषयी संदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे, कदरे, दहातोंडे यांनी केले. वसंतराव येवले यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!