| मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : चळवळीत गेली – पाच दशके अविरतपणे निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारे हिंदू खाटिक महासंघांचे अध्यक्ष जयंतराव काथवटे यांना मुंबईत महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
लातूर येथील जयंतराव काथवटे यांचे सामाजिक चळवळीत मोठे कार्य आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा मानलेला राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण २०२२-२३ या वर्षाचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, आ. भरत गोगावले, आ. किशोर दुर्गेकर यांच्या हस्ते हिंदू खाटिक महासंघांचे अध्यक्ष जयंतराव काथवटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. वंचित, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले आहे. मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सभागृहात दि. १२ मार्च रोजी दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यातील ३९३ व्यक्ती आणि संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे, दादासाहेब गायकवाड, संत रोहिदास यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आले.