डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह राजेश्वर निटुरे यांचा भाजपात प्रवेश

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर यांनी आज शनिवारी मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनीही भाजपात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. गेल्या काही महिन्यांपासून डॉ.अर्चना पाटील चाकूरकर या भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर घेतला होता. या प्रवेशामुळे लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील असे मानले जाते. शिवराज पाटील चाकुरकर यांचे पाठीराखे खूप आहेत. ते मतदान भाजपच्या पदरी पडेल, असा दावा केला जात आहे. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. त्यामुळेच डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!