लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : प्रलंबित देयक काढण्याचे कामासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवार, दि. ३१ मार्च रोजी रंगेहाथ अटक केली. बळीराम सोनकांबळे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत गुत्तेदार असून शासकीय कामाचे गुत्तेदारीचे काम करतात. १५ वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी मधून ग्रामपंचायत पार (ता. अहमदपूर जि. लातूर) येथे पाईपलाईन व नळ कनेक्शन जोडणीचे काम तक्रारदार यांनी केले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे प्रलंबित देयकासाठी ते ३१ मार्च रोजी लघु पाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर कार्यालया मधील कनिष्ठ अभियंता बळीराम सोनकांबळे यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित देयक काढण्याचे कामासाठी म्हणून एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी बळीराम सोनकांबळे यांनी १५ हजार रुपये आत्ता व उर्वरित रक्कम देयक मिळाल्यानंतर स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम स्वतःचे कार्यालयात शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली आहे. यामध्ये दुसरा आरोपी खासगी इसम पंडित शेकडे यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. दोन्ही आरोपींना सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन अहमदपूर जि. लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!