» मुखपत्र दक्षता वृत्तांत
हिंगोली / प्रतिनिधी : घरकुल अनुदानाचा शेवटचा उर्वरित हफ्ता देण्यासाठी 18 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कळमनुरी पंचायत समितीमधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मोहम्मद अखीब मोहम्मद वाजिद यास हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर घरकुल मंजूर असून, बांधकाम पूर्ण झाल्याने, त्या फाईलवर सही करून उर्वरित घरकुलाचा हफ्ता तक्रारदाराच्या पत्नीच्या खात्यावर जमा करण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागितली होती पण, तडजोडीनंतर 18 हजार रुपये ठरले. 18 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सन 2020 मध्ये पण याच पंचायत समितीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी व तत्कालीन साहायक लेखाधिकारी अशा दोघांवर लाचप्रकरणी कारवाई झाली होती.