लातूर / प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता नुकताच पोलिस दलातर्फे एमआयडीसी हद्दीत रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्चच्या वेळी पोलीस निरीक्षक नरवाडे यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यातून निघून एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एलआयसी ऑफिस, इंडिया नगर, विक्रम नगर, विशाल नगर, साई मंदिर, बोधी चौक भागामध्ये लोकसभा निवडणूक अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला आहे. या तीन ते चार किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून रूटमार्च समाप्त झाला. आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ साठी लातूर जिल्हा पोलिस दल सज्ज आहे.