वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; चोरी गेलेल्या २ बॅटऱ्या हस्तगत

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

गोंदिया / प्रतिनिधी : गोरेगाव येथील लक्ष्मी एग्रो कंपनी यांच्या जेसीबी ४०७ वाहन, ट्रॅक्टर, व ट्रॉली यांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तिघांना जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चोरीच्या २ बॅटऱ्यासह अटक केली. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चोरी झालेल्या घटनास्थळास भेट देवून कंपनीतील सिसीटिव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून प्राप्त सीसीटिव्ही फुटेज, गुप्तबातमीदारांच्या गोपनीय माहितीवरून अनोळखी चोरट्यांचा शोध घेवून नमूद गुन्हयाची उकल केली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीत १) संदिप रमेश गौतम वय २१ वर्षे रा. राधाक्रष्ण कॉलनी, तिरोडा रोड, गोंदिया, २) हर्षित उर्फ राहुल पुरण बिसेन वय ३३ वर्षे रा. तिलक वार्ड कन्हारटोली, गोंदिया, ३) आशिष उर्फ आशु श्रीकष्ण बिसेन वय २२ वर्षे रा. बोळुंदा ता. गोरेगांव यांचा समावेश आहे. याप्रकरणाचा पुढील अधिक तपास गोरेगांव पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनद झा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार इंद्रजित बिसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले, लक्ष्मण बंजार यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!