शेतीच्या वाटणीवरून वडिलांनीच केला मुलाचा खून

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

धाराशिव / प्रतिनिधी : तालुक्यातील करजखेडा येथे संदेश भाउसाहेब पाटील, वय २३ वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांचा त्यांचे राहते घरासमोर मध्यरात्री ओठ्यावर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २५ मे ला उघडकीस आली. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. आरोपी हे मयत तरुणाचे वडील व भाऊ असल्याचे निष्पन्न झाले असून, जमीनीचे वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन खून केल्याची कबुली आरोपीनी दिली.

 गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने मयताचे वडील भाउसाहेब गोविंदराव पाटील व भाऊ प्रितम भाउसाहेब पाटील यांना ताब्यात घेवून सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता सदरचा गुन्हा आम्हीच केला आहे अशी त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी नमूद संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

सदर जटील गुन्ह्याची उकल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस अंमलदार अमोल निंबाळकर, विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, नितीन जाधवर, बबन जाधवर, संतोष लाटे, घुगे, किवंडे, महिला पोलीस अंमलदार शैला टेळे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!