पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणारे अटकेत

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

पिंपरी चिंचवड / प्रतिनिधी : पिस्तूलाचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी गजाआड केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने या टोळीला जेरबंद केले.
अजय शंकर राठोड वय २१ वर्षे, रा. ऐअर रोड चंडा नाईक तांडा, पाषाण वीट भटटी जवळ विजय तिम्हण यांची चाळ पाषाण पुणे व जिशान जहीर खान, वय २३, रा. वॉर्ड नं. ३. दापोडी, पुणे मुळ गाव रा. रसल पुर, मुजफ्फर, ता. नगीना, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या टोळीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी तेथे सापळा रचला. यात ही संशयित टोळीतील दोघे वेगवेगळ्या ठिकाणी सापडली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तूल सापडले. या दोघांना अटक करुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुस ब्रीज जवळील डोंगरावर पाषाण पुणे येथे त्यांचे इतर तीन साथीदारांसह मिळुन गावठी रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून एक जणाचे अपहरण करुन त्यांचेकडुन त्याचे गळयातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन एकुण पस्तीस हजार रुपये किमतीची एक ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगस्त करण्यात केली असुन त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं.४६९/२०२४ भा.द.वि. कलम ३९७, ३६४(अ), आर्म अॅक्ट ३, २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या टोळीकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापु बांगर,  सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि राम गोमारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. पोलीस अंमलदार बंडू मारणे,ओमप्रकाश कांबळे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, सागर पंडीत आदींच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!