गुटख्याचा कारखाना उद्‌ध्वस्त; आयपीएस बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाची उत्कृष्ट कामगिरी, तब्बल तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

5 Min Read
लातूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुटखा कारखान्यावर धाड, ३ कोटी ५ लाखांचा माल जप्त (छायाचित्र : मुखपत्र दक्षता टीम)
लातूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुटखा कारखान्यावर धाड, ३ कोटी ५ लाखांचा माल जप्त (छायाचित्र : मुखपत्र दक्षता टीम)

२०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. तेव्हापासून आजपर्यंत गुटखाबंदी लागू आहे, गुटखा कुठं आढळल्यास अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन कारवाई सुद्धा करते. मात्र खरचं महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे का असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर नाही असंच आहे. लातूर जिल्ह्यात अगदी कुठल्याही पानपट्टीवर जावा आणि गुटखा मागा. तुम्हाला तो सहज मिळेल. ५ रुपयामध्ये १ पुडी ते ३० रुपयांची १ पुडी वेगवेगळ्या कंपनीनुसार प्रत्येकाची वेगळी किंमत आहे. लातूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखत पोलीस प्रशासन मात्र वेळोवेळी कारवाया करताना दिसत आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ३ कोटी ५ लाखांचा अवैध गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्रात नक्की गुटखाबंदी आहे का? असा प्रश्न पडतो. गुटखा विक्रीचा हा धंदा सगळीकडे बिनधास्त पणे सुरु आहे. त्यामुळे एकवेळ औषधं मिळणार नाही पण गुटखा मात्र विश्वासाने मिळेल, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील अतिरीक्त एम.आय.डी.सी. परिसरात एका वेअर हाऊसमध्ये बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करून सदर माहिती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना दिली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील कोंबडे अॅग्रो वेअर हाउस, प्लॉट नंबर सी- २७ या ठिकाणी छापा टाकला. याठिकाणी पोलिसांना गोवा गुटखा ठेवलेले पांढरे रंगाचे नायलॉनचे पोते- ४८ (प्रति पोत्यामध्ये एकुण ४२० गोवा गुटख्याचे पुडे) प्रति पुडा २४० रुपये प्रमाणे एकुण- २०,१६०/- पुडे एकूण किंमत ४८ लाख ३८ हजार ४०० रुपये, खुल्या स्वरुपात पॅकींग न करता गोवा गुटखा तयार करुन ठेवलेले पांढरे रंगाचे ५९ पोते (१,२०,०००/- प्रमाणे) एकूण किंमत ७० लाख ८० हजार रुपये, सुगंधीत तंबाखूचे १८ पोते एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये, सुंगंधीत सुपारीचे पांढरे ११० पोते (काळे रंगांची सुपारी) किंमत ५५ लाख रुपये, सुगंधी गुटखा पावडर ४९ पोते किंमत ४९ लाख रुपये, गोवा गुटखा रॅपर रोल ७५ बंडल किंमत ३ लाख ७५ हजार रुपये, गोवा गुटखा पॉकेट कव्हर रोल ७५ बंडल पोत्यामध्ये भरलेले ३ लाख ७५ हजार रुपये, गुटखा पॅकींग १३ मशीन ३२ लाख ५० हजार रुपये, पॅकींग रोलर मशीन- ३ पुडी पॅकींग किंमत ६० हजार रुपये, गुटखा पोते शिवण्याचे मशीन २ किंमत २० हजार रुपये, गुटखा वजन करण्यासाठी वापरणारे ३ ईलेक्ट्रीक मोठे वजन काटे किंमत ३० हजार रुपये, गुटखा वजन करण्यासाठी वापरणारे २ ईलेक्ट्रीक लहान वजन काटे किंमत १० हजार रुपये, वजीर गुटखा पॅकींग ४ रॅपर रोल किंमत २० हजार रुपये, गुटखा भरण्यासाठी वापरणार असलेले पांढरे रंगाचे १०० नायलॉन पोते किंमत १ हजार रुपये, गोवा गुटखा ठेवलेले पांढरे रंगाचे नायलॉनचे पोते- ०३ (प्रति पोत्यामध्ये एकुण ४२० गोवा गुटख्याचे पुडे) किंमत ३ लाख २ हजार ४०० रुपये, सुगंधीत तंबाखुचे ४ पोते किंमत ४० हजार रुपये, सुंगंधीत सुपारीचे पांढरे ६ पोते (काळे रंगांची सुपारी) किंमत ३ लाख रुपये, ट्रक क्रमांक- एमएच २३ डब्ल्यू ०९८१ याची कि. अं. २५ लाख रुपये, गोवा गुटखा ठेवलेले पांढरे रंगाचे नायलॉनचे पोते- ०२ (प्रति पोत्यामध्ये एकूण ४२० गोवा गुटख्याचे पुडे) किंमत २ लाख १ हजार ६००रुपये, सुगंधीत तंबाखूचे २ पोते किंमत २० हजार रुपये, सुंगंधीत सुपारीचे पांढरे ४ पोते (काळे रंगांची सुपारी) किंमत २ लाख रुपये, पिक अप क्र- एमएच १४ ईएम १७७६ याची कि.अं ६ लाख रुपये असा एकूण ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुरनं ३६२/२०२४ कलम ३२८,१८८,२७२,२७३,३२८,३४ भारतीय दंड विधान सहकलम ५९ अन्नसुरक्षा व मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात १) अंकुश रामकिशन कदम वय ३२ वर्षे रा. रामवाडी ता. चाकुर जि. लातूर, २) हसनाकुमार तिलाई उराम वय २१ वर्षे रा. शाहबगंज पोस्ट पिरवाह जि. अररीया राज्य बिहार, ३) गोकुळ धनाराम मेघवाल रा. चुवा तहसील ठेंगाणा जि. नागोर राज्य राजस्थान, ४) धनंजय गहिनीनाथ कोंबडे रा. लातुर, ५) पारस बालचंद पोकर्णा, रा. लातुर, ६) राम केन्द्रे रा. लातुर, ७) विजय केन्द्रे रा. लातुर यांच्या नावाचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, होनाजी चिरमाडे, पोलीस अंमलदार विष्णु गुंडरे, अनंतवाड, कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!