अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास लातूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पकडून एका आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यातून वाहनासह चौदा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून राज्यात गुटखा बंदी करण्यात आली आहे. परंतु या बंदी आदेशाला झुगारून सर्रासपणे गुटख्याची वाहतूक आणि विक्री करण्यात येते. गुटखा माफियांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास एका वाहनांतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीवरून लातूर ग्रामीण पोलिसांनी मौजे पेठ गावाजवळ सापळा रचला. काही वेळानंतर पथकाला एम.एच.०४/जीआर/५१७० या क्रमांकाचे पीकअप वाहन येताना दिसून आले.

यावेळी पोलिसांनी वाहन थांबवून त्याची कसून तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कलाम सलिम शेख रा.शेरा ता.रेणापुर जि. लातुर यांना ताब्यात घेतले तर संतोष सुरेश कांबळे रा.शेरा ता.रेणापुर जि. लातुर (फरार)आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून वाहनांसह १४ लाख ९८ हजार ५६० रुपयांचा गुटखा जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, भगवान मोरे, विष्णू चौगुले पोलीस अंमलदार जाकीर सय्यद, बाबुराव येनकुरे, दाजीबा यादव, सचिन चंद्रपाटले, राहुल दरोडे, अस्लम सय्यद, खंडागळे यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!