किरकोळ कारणावरून तरुणाचा खून ; संजयनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात गुन्ह्याची उकल करत केली तिघांना अटक 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

सांगली : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी एका तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवार (ता. ११) सकाळी साडे आठ पूर्वी घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयित तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे.

भांडणात मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. शांतीनिकेतन शाळेजवळ सांगली) यांचा खून झाला. याप्रकरणी हणमंत रामचंद्र शिंदे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रतिक रामचंद्र शितोळे वय २३ रा.जुना कुपवाड रोड शामनगर पाण्याचे टाकीजवळ कुपवाड, गणेश जोतीराम खोत वय ३० रा. माळी गल्ली नंबर -०१ माळी वस्ती संजयनगर सांगली, सिध्दनाथ राजाराम लवटे वय २५ सध्या रा. माळी गल्ली नंबर ०१ माळी वस्ती संजयनगर सांगली मुळ रा. एरळे ता. कवठेमहाकांळ जि. सांगली याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल सोमवार (दि.१०) रोजी कुरणे चौकातील एका देशी दारू दुकानासमोर किरकोळ कारणावरून मयत मयुरेश व प्रतिक, गणेश, सिद्धनाथ त्यांच्यात शाब्दिक भांडण झाले. त्या वेळी शेजारी पडलेला दगड मयुरेश यांच्या डोक्‍यात घातला. त्या वेळी डोक्‍यातून थोडा रक्तस्राव झाला. दरम्यान, त्यांच्या डोक्‍यातून रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नमूद तिघांना संजयनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक करत गुन्ह्याची उकल केली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर, सांगली शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार सुरज सदामते, विनोद सांळुखे, नवनाथ देवकते, अशोक लोहार, दिपक गायकवाड, सुशांत लोंढे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!