पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस अंमलदार नितीन कठारे यांचा ‘डिटेक्शन ऑफ द मंथ’ ने गौरव 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : येथे जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार नितीन कठारे यांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘डिटेक्शन ऑफ द मंथ’ ने सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मे महिन्यातील कामगिरीसाठी जिल्ह्यातील अधिकारी – अंमलदारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांची उपस्थिती होती.

 

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर / प्रतिनिधी : येथे जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार नितीन कठारे यांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘डिटेक्शन ऑफ द मंथ’ ने सन्मानित करण्यात आले.पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मे महिन्यातील कामगिरीसाठी जिल्ह्यातील अधिकारी – अंमलदारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांची उपस्थिती होती.सन २०१३ मध्ये लातूर जिल्हा पोलीस दलात नेमणूक झालेल्या नितीन कठारे यांनी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. पोलीस खात्यातील उल्लेखनीय/ उत्कृष्ट कामगिरीसाठी यापूर्वीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या सेवा कालावधीत श्री नितीन कठारे यांना २०८ बक्षिसे आणि ११ प्रशंसापत्र मिळालेली आहेत. पोलीस अंमलदार नितीन कठारे यांची पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष अशी ओळख आहे. जिल्हा पोलीस दलात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘डिटेक्शन ऑफ द मंथ’ ने पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्री. कठारे यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

सन २०१३ मध्ये लातूर जिल्हा पोलीस दलात नेमणूक झालेल्या नितीन कठारे यांनी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. पोलीस खात्यातील उल्लेखनीय/ उत्कृष्ट कामगिरीसाठी यापूर्वीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या सेवा कालावधीत श्री नितीन कठारे यांना २०८ बक्षिसे आणि ११ प्रशंसापत्र मिळालेली आहेत. पोलीस अंमलदार नितीन कठारे यांची पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष अशी ओळख आहे. जिल्हा पोलीस दलात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘डिटेक्शन ऑफ द मंथ’ ने पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्री. कठारे यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!