औसा तालुक्यात गावठी पिस्तूलसह एकजण ताब्यात

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : औसा तालुक्यातील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ जून रोजी गावठी पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणात महेश दिनकर कुलकर्णी (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला औसा तालुक्यातील टाका येथील महेश कुलकर्णीकडे गावठी पिस्तूल असल्याचे समजले. या माहितीनंतर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक विश्वम्भर पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, केंद्रे, प्रदीप चोपणे यांनी महेश कुलकर्णी (रा. टाका ता.औसा) यास ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन मोठया कौशल्याने अधिक चौकशी करून त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुस असे एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल कोठून घेतली व कशासाठी घेतली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!