महाराष्ट्र एटीएस प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : मागील जवळपास तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी १९९५ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते हे प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पोलीस महासंचालकपदी केंद्रात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश गृहविभागाने जारी केले. बजाज हे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!