२०१३ च्या परिक्षेतील ६ अंमलदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : नि: शस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील पात्र असलेल्या ६ पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी याबाबतचे आदेश काढला आहे.

पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आणि पुढील कंसात पोलीस उप निरीक्षक म्हणून झालेले नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे : मोहम्मद मंजू हुसेन मोहम्मद जफर हुसेन (नांदेड), रुपेश आमृ चव्हाण (वाशिम), धनंजय आण्णा शिंदे (सातारा), अशोक ज्ञानु साळुंखे (सातारा), नंदकुमार राजाराम शेट्ये (सिंधुदुर्ग), शिवाजी सोनु गागरे (नाशिक शहर).

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!