लातूरला स्वतंत्र विद्यापीठासाठी, आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लक्षवेधी निदर्शने 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे :  लातूर जिल्हयाची शिक्षण क्षेत्रातील भरारी पाहता, आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरलेली आहे. माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सुरु करण्यात आले आहे त्याच धर्तीवर लातूर येथे शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यापीठ मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. लातूरकराच्या आग्रही मागणीतून व लातूरचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत पेठ येथे उपकेंद्र सुरु करण्यात आलेले आहे. आज लातूर जिल्हयात कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, विधि, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय, तर कायम विनाअनुदानित ८२ असे जवळपास एकूण ११८ महाविद्यालये आहेत एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१० आहेत तर लातूर शहरात त्यापैकी ४० महाविद्यालये आहेत. लातूरच्या शैक्षणिक, प्रशासकीय कामाचे स्वरूप लक्षात घेता, महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना नांदेडला पायपीट करावी लागते आहे, शेजारच्या सोलापूर जिल्हयासाठी महाविद्यालयाची संख्या १०९ असताना विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर नंतर लातूर शहर, जिल्हयाचे शैक्षणिक योगदान मोठे आहे त्यामुळेच लातूर येथे शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यापीठाची आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात येते आहे. शिक्षणतज्ञ डॉ राम ताकवले व अन्य शिक्षण तज्ञांनी सुद्धा विद्यार्थी संख्या व महाविद्यालयाची आकडेवारी प्रमाणे जिल्हा निहाय विद्यापीठ स्थापन करणे काळाची गरज आहे, शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता कार्य कुशलता वाढविण्यासाठी आवश्यक पूर्तता होणाऱ्या ठिकाणी नविन विद्यापीठ विस्तार होणे पुरक असल्याचे मते नमुद केलेली आहेत. आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी ते ना राज्यपाल, ना मुख्यमंत्री यांना निवेदने, धरणे, स्वाक्षरी मोहीम, पोस्ट कार्ड मोहिम, महात्मा गांधी चौक लातूर येथे सलग चार दिवस बेमुदत उपोषण आंदोलनाच्या माध्यमातुन विद्यापीठाची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. लातूरला स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी महात्मा गांधी चौक लातूर येथे शासनाचे व सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी निदर्शने आंदोलन केले असल्याची माहिती मुख्यसंयोजक ॲड.प्रदिपसिंह गंगणे यांनी दिली आहे. यावेळी समन्वयक बालाजीप्पा पिंपळे, सिनेटसदस्य धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर, शिरीषकुमार शेरखाने, जम्मालोद्दीन मणियार, अजयसिंग राठोड, फिरोज तांबोळी, दिगबर कांबळे, महेन्द्र गायकवाड, आकाश कांबळे, लहू जाधव खरोळे, किरण कांबळे, अतिश नवगिरे, ॲड.परमेश्वर इंगळे, स्वामी रत्नेश्वर, यशपाल ढोरमारे, श्रीकांत गंगणे, दिनेश डोईजड, राजू बुये, शंकर काळे, विकास माने, बिपिन चौहाण, वैशाली महालींगे, राहुल पवार, मंगेश डोबाळे, अमर पाचांगे, संतोष जाधव आदीची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!