» मुखपत्र दक्षता वृत्तांत
चाकूर / प्रतिनिधि : घरगुती वादातून पत्नीने पतीला पोळपाटाच्या साहाय्याने डोक्यावर, तोंडावर मारहाण करून दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे घडली. राजकूमार किशन कांबळे (वय ४० वर्षे रा.नळेगाव ता. चाकूर जि.लातूर असे मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी संगिता राजकूमार कांबळे हिच्या विरूध्द चाकूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. चाकूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अवघ्या कांही तासात जटील अश्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करत आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संजीव किशन कांबळे (वय ३५, रा.नळेगाव ता. चाकुर जि. लातुर) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे करत आहेत.