» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : जिल्हा पोलीस दलात पदोन्नती आणि बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. त्यानुसार, लातूर जिल्हा पोलीस दलातील ३० सहायक पोलीस उपनिरीक्षकांना ‘श्रेणी पोलीस उपनिरीक्षक’ पदी बढती देण्यात आली आहे. यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलिस सेवेत ३० वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी तीन वर्षे कर्तव्य बजाविलेल्या ३० जणांना ‘श्रेणी पोलीस उपनिरीक्षक’ पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात, पोलीस मुख्यालयातील रमेश मच्छिंद्रनाथ गर्जे, विठ्ठल बाबुराव भांडूळे, बालाजी श्रीमंतराव बिरादार, असलमखान गुलाम अहमद पठाण, माधव केशव गिरी, व्युंकराम पंडु चामे, जिल्हा विशेष शाखेतील हसन सय्यदसाब चाऊस, गांधी चौक पोलीस ठाण्यातील रामचंद्र भानुदासराव ढगे, हरीराम गोविंदराय सोनकांबळे, पंडीत लक्ष्मणराव भंडारे, लातूर ग्रामीण उपविभागातील व्यंकट गोविंदराव मुळे, उत्तम परशुराम पवार, वाढवणा पोलीस ठाण्यातील अजय दिगंबर सूर्यवंशी, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील लक्ष्मण जनार्दन केंद्रे, जळकोट पोलीस ठाण्यातील सुभाष नरहारी हारणे, रमेश उमाशंकर मिटकरी, राहुल केरबा भोपनीकर, औसा पोलीस ठाण्यातील जनक बाबासाहेब इंगळे, संतोषकुमार रामराव खोत, दगडू निवृत्ती अडसुळे, मुरुड पोलीस ठाण्यातील रामराव जेमा चव्हाण, चाकूर पोलीस ठाण्यातील अच्चूत नागोराव सूर्यवंशी, देवणी पोलीस ठाण्यातील बब्रुवान पुंडलिक बानाटे, श्वानपथक विभागातील संजय दादाराव मुंढे, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रकाश माणिकराव भोळे, विद्यासागर गोविंद जाधव, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील गोविंद लक्ष्मण गिरी, उदगीर शहर उपविभागातील तुळशीदास मारुती मुरुमकर, भादा पोलीस ठाण्यातील अकीलसाब इमामसाब पठाण आणि मोपवि संजय सूर्यभान जावाडे यांचा समावेश आहे.