एका दिवसात मालमत्ता कराची तब्बल ‘३.८’ कोटी रुपयांची विक्रमी वसुली; पालिकेच्या करसंकलन विभागाचे यश

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मालमत्ता करवसुली हाच आहे. अशातच पालिकेच्या करसंकलन विभागाने एकाच दिवसात विक्रमी अशी मालमत्ता कर वसुली केली आहे. कर संकलन विभागाने एकाच दिवसात तब्बल ‘३.८’ कोटी रुपयांची वसुली केली आहे.

लातूर मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या निर्देशांनुसार व उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभागामार्फत वर्षाच्या सुरुवाती पासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम/योजना राबविण्यात येत असत. त्यानुसार थकबाकीदार मालमत्ता धारक व गाळे धारक यांच्याकडील थकीत कराची रक्कम पाहता ही प्रकरणे लोकअदालत मधे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने तब्बल दोन हजार थकबाकीदार मालमत्ता धारकाना लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याची नोटिस बजावण्यात आली होती. तेव्हा अधिकाधिक थकबाकीदार यांच्याकडून टॅक्स वसुली व्हावा या दृष्टीने एक दिवसाकरिता १००% शास्ती मधे सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदरील सुट ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसात मालमत्ता धारकाकडून तब्बल ३.८ कोटी चे कर संकलन झाले आहे. तसेच मालमत्ता विभाग मार्फत थकीत गाळे भाडे असणारे १५० गाळे धारकाना सुद्धा लोकअदालत ची नोटीस बजावण्यात आली होती व त्यांच्याकडून २३ लाख गाळे भाडे वसुली झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!