मुखपत्र दक्षता वृतांत
देवणी : तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर असलेले शेत जमिनीची नोंद तक्रारदाराच्या नावावर करून देण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना नावावर करून देण्याचे भासवून लासोन्याचा मंडळ अधिकारी राजेंद्र शिवप्पा हालकुडे याने तक्रारदार यांच्याकडे 9000/- रुपयाची लाचेची मागणी करून दि. 06/06/2024 रोजी दुपारी 03:45 वाजण्याच्या सुमारास आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडून तक्रारदाराचे मित्राचे फोन पे द्वारे 9000/- रु. लाचेची रक्कम स्विकारली. सदर बाबत तक्रारदार यांना आपल्याकडून घेतलेली रक्कम ही लाच असल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता.
सदर तक्रारी अर्जाच्या चौकशी अहवालावरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
– संतोष बर्गे,
पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
मो.नं. 7744812535
दुरध्वनी क्रमांक 02382-242674,
टोल फ्रि क्र. 1064