प्रशासकीय: लातूर जिल्हा पोलीस दलात खांदेपालट

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : जिल्हा पोलीस दलातील ६ अधिकार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये पोलीस निरीक्षक दर्जाच्या सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्याबाबतचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश पारित केले आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आणि बदली झालेले ठिकाण याप्रमाणे- पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर येथील पोलीस निरीक्षक अभिषेक लक्ष्मण शिंदे यांची उदगीर शहर पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर येथील पोलीस निरीक्षक संतोष अशोक पाटील यांची विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ किशनराव मुंढे यांची विनंतीवरून जळकोट पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर येथील पोलीस निरीक्षक राजकुमार पदमाकर पुजारी यांची अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, लातुर येथे, रेणापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक अबासाहेब अनंत्रे यांची पोलीस ठाणे सायबर सेल, लातूर येथे बदली झाली आहे. जळकोट पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रदिप शिवाजी काकडे यांची रेणापूर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदल्याची यादी शनिवार दि. ३ ऑगस्ट ला प्रसिध्द झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!