औसा : कवठा केज (ता.औसा) येथे अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करून दोन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. लातूर क्राईम ब्रांच व भादा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
औसा तालुक्यातील कवठा केज येथे अवैध हातभट्टी अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने रविवार (दि. ४) रोजी सकाळी सव्वा नऊ सुमारास कवठा केज येथे शेतातील झाडीझुडपात सुरु असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलीस पथकाने तब्बल दोन लाख अठरा हजार रुपयांची गावठी हातभट्टीचे दारू व दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले असून ही हातभट्टी जाग्यावरच उध्वस्त केली. या छाप्यादरम्यान गावठी दारूचे हातभट्टी चालवणाऱ्यानी पळ काढला आहे. परंतु अद्याप पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मानवी जीवतीस हानी पोहचेल असे द्रव्ये व गावठी हातभटटी तयार दारू आपले कब्जात बाळगेलेले मिळून आले म्हणून कलम १२३ भा. न्या.सं, म.दा.का.कलम ६५ फ प्रमाणे आरोपी रामधन नामदेव जाधव वय ५५ वर्ष, रविकांत भारत जाधव वय ३८ वर्ष दोघे रा. कवठा केज तांडा ता. औसा यांच्याविरुद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि राहुलकुमार भोळ, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार प्रकाश भोसले, योगेश गायकवाड, सुरेश कलमे, देशमुख, धाकपाडे यांच्या पथकाने पार पाडली.