सहा हातभट्टी अड्ड्यावर छापेमारी:स्थानिक गुन्हे शाखा व कासार सिरसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली कोराळवाडी परिसरात कारवाई

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत 

कासार सिरसी : स्थानिक गुन्हे शाखा व कासार सिरसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने एकाच दिवशी सहा ठिकाणी छापेमारी करून हातभट्टी विक्रेत्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कोराळवाडी परिसरातील हातभट्टी विक्रेत्यांकडील २ लाख ३७ हजारांचे दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, दारु व इतर साहित्य नष्ट केले आहे. सहाजणांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 कोराळवाडी (ता. निलंगा) भागात गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे सुर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, कासार सिरसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रवीण राठोड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक भुजबळ, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, रियाज सौदागर, गायकवाड, सचिन धारेकर, जमीर शेख, शिरसाठ, घोरपडे, सोनटक्के यांच्या पथकाने कारवाई केली. कोराळवाडी गावचे हद्दीत शेतालगत असलेल्या सहा हातभट्टीवर कारवाई केली. पोलिसांनी अडीच लाखांचा दारू तयार करण्यासाठी आवश्यक साठा जप्त करून नष्ट केला. याप्रकरणी नामदेव नरसिंग बुकले, सायबा महादू कानाडे, संजय गोविंद पाटील, राम अण्णाराव दगदडे, वेंकट दौलप्पा देवणे, शामराव शिवाजी भोगिले (सर्व रा. कोराळवाडी ता. निलंगा) यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाने गुन्हा दाखल केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!