राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या

3 Min Read
IPS Officer Transfers

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने मंगळवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्तींचे आदेश जारी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या खांद्यावर नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी देत पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पालवे यांच्या जागी सचिन बाळासाहेब गुंजाळ हे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य पोलीस दलात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक लता पाटलोबा फड यांची छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस अधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त विक्रांत विश्वास देशमुख यांची येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक रुपाली पोपटराव दरेकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उप आयुक्त रश्मी नांदेडकर यांची नवी मुंबई पोलीस दलात पोलीस उप आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथील मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांची बृहन्मुंबई येथे पोलीस उप आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.

तर बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त राजू भुजबळ यांची महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथे मुख्य सुरक्षा अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे. बृहन्मुंबई येथील पोलीस उप आयुक्त दत्ता किसन नलावडे यांची लोहमार्ग मुंबई येथे पोलीस उप आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर नवी मुंबई येथील पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांची बृहन्मुंबई येथे पोलीस उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची नागपूर येथील लोहमार्ग विभागात अपर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर येथील पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस उप आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे तर रा.रा.पोलीस बल, गट क्र.१३, गडचिरोली येथील समादेशक विवेक विठ्ठल मासाळ यांची पुणे शहर येथे पोलीस उप आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई लोहमार्ग विभागातील पोलीस उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांना नागपूर येथे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उप आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उप आयुक्त मीना मकवाणा यांची ठाणे शहर पोलीस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक अनिता दिलीपराव जमादार यांची छत्रपती संभाजीनगर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस अधीक्षक बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!