हिंदू खाटिक समाजाचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

3 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत 

मुंबई / साईनाथ घोणे : राज्यातील हिंदू खाटिक समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदू खाटिक युवा संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती.

आज सकाळी १० वाजता या बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे, मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असं उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

१)हिंदूखाटीकसमाजभूषण,महामानव,सत्यशोधक समाजाचे अग्रदुत डॉ.संतुजी रामजी लाड यांची ४ मार्च जयंती तर ८ ऑक्टोबर पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व तसेच डॉ संतुजी रामजी लाड यांचे नावे “आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे.

२) महाराष्ट्रातील हिंदु खाटीक समाजाला विविध भागात विविध नावाने उदा. मराठा खाटीक,क्षत्रिय खाटीक,धनगर खाटीक, कलाल,खाटीक कलाल, बक्कर कसाब, लाड खाटीक, बक्कर खाटीक या नावाने ओळखले जाते. जे सर्व पिढ्यान पिढ्या लहान प्राण्यांचे मांस विक्रीवर उपजीविका भागविनारे एकमेकांचे रक्त-नातेवाईक खाटीक जातीचे असल्याची वस्तू स्थिती शासनाने स्वीकारावी.

३) डॉ.संतुजी रामजी लाड यांचे नावे समाज मंदिर, सांस्कृतिक सभागृह, समाज भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे व मिटकॉन लि.मार्फत मटन व्यवसायिकांना चिकन,मटन,मासे फूड प्रोसेसिंग च्या माध्यमातून जोडधंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे,तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय निशुल्क क्षमता बुद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण देणे.

५) शिवचित्रकार कलायोगी गोपाळराव बळवंतराव कांबळे कोल्हापूर यांना मरनोपरांत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावें.

६)संत उपासराव महाराज नागपूर संत गंगानाथ महाराज मठ, पुणे यांच्या विकासासाठी आर्थिक भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.

७) हिंदु खाटीक समाजाच्या उन्नतीसाठी कलस्टर हाऊसची निर्मिती करावी तसेच डॉ संतुजी रामजी लाड यांच्या नावे शैक्षणिक संकुल ,निवासी विद्यालय निर्माण करण्यात यावे.

८) महाड चवदार तळे क्रांतिकार लढयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे सहकारी रामचंद्र खडूजी कांबळे उर्फ चंदू मामा खाटीक, स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव इंगोले, व स्वातंत्र्यसैनिक रघुनाथनाना जाधव, अशोक पेंढारी यांच्या नावे सामाजिक न्याय विभागातर्गत पुरस्कार देण्यात यावा.

९) डॉ.संतुजी रामजी लाड यांचा जन्म, कार्य ठाणे जिल्ह्यामध्ये होते तसेच ते ठाणे तत्कालीन नगर पालिकेचे सदस्य म्हणून ही कार्यरत होते त्यामुळे त्यांचे ठाणे शहरात स्मरण व्हावे यासाठी ठाणे,लातूर या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांच्या विकासांतर्गत स्मारक, अभ्यासिका, ग्रंथालय उभारण्यात यावे.

१०) महाराष्ट्र राज्यात मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एस सी प्रवर्गाचे अ ब क ड वर्गीकरण करणार असाल तर हिंदू खाटीक जातीसाठी स्वतंत्र ५% टक्के आरक्षण आरक्षित ठेवण्यात यावे, आदी मागण्यासाठी ॲड.प्रदीपसिंह गंगणे लातूर, ॲड.अमितकुमार कोथमिरे सोलापूर, सुनिलकुमार कांबळे छत्रपती संभाजी नगर, संजयकुमार साबणे नांदेड, बालाजी बिनवडकर, डॉ.रावसाहेब खिरडकर जातेगाव नाशिक, दिगंबर कांबळे लातूर, अमोल फिसके देवणार मुंबई, योगेश डोंगरे, महेश विजापूरे, इंद्रजित गंगणे, चंद्रकांत आबा थोरात, सुरेश थोरात पुणे, सूरज कांबळे आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!