खाटिक समाजाचा आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस; वाढता पाठिंबा,

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

मुंबई / प्रतिनिधि: हिंदू खाटिक समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदू खाटिक युवा संघटनेच्या वतीने काल ९ ऑगस्ट क्रांती दिना रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शनिवारी या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हिंदू खाटिक समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, असा निर्धार यावेळी आंदोलकांचा आहे. आंदोलनस्थळी ॲड.प्रदीपसिंह गंगणे लातूर, ॲड.अमितकुमार कोथमिरे (सोलापूर), सुनिलकुमार कांबळे (छत्रपती संभाजी नगर), सुभाष क्षीरसागर (मुंबई), संजयकुमार साबणे (नांदेड), बालाजी बिनवडकर, दिगंबर कांबळे (लातूर), योगेश डोंगरे, महेश विजापूरे, इंद्रजित गंगणे आदी उपस्थित आहे. यावेळी आंदोलकांचा उत्साह वाढवत पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक रितेश खराटे (कल्याण डोंबिवली महानगर पालिका), राहुल कोथिंबीरे (पंढरपूर), देविदास काथवटे (कुरुडवाडी), अभिषेक जमदाडे (ठाणे), शेखर लाड, शलाका शेखर लाड, ॲड. प्रीती साबणे (मुंबई), महेंद्र घोलप (कल्याण), रमेश जाधव (नाशिक), विलास घोटणे (कुर्ला), शाम हराळ (बीड), सुभाष क्षीरसागर (पनवेल जि. रायगड), दिनेश पारडे (कल्याण) यांनी भेट देत पाठिंबा दिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!