पदभार स्वीकारला:जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्वीकारला पदभार

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत

वर्धा : नागपूर शहर पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांची पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून शुक्रवार (दि.१६)रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. तत्कालीन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११ नवी मुंबई येथे समादेशक पदी बदली झालेली असून, त्यांच्या जागी अनुराग जैन रुजू झाले. त्यांनी नुरुल हसन यांच्याकडून पदभार स्वीकारला.

 

भारतीय पोलीस सेवेतील यंग पोलीस अधिकारी अनुराग जैन यांनी यापूर्वी यवतमाळ, लातूर, नागपूर या जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!