निलंगा येथील हिंदू खाटीक समाजातील गुणवंताचा सत्कार संपन्न 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

निलंगा : तालुक्यातील हिंदू खाटिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू खाटिक समाज निलंगाच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू खाटिक समाज निलंगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद हातांगळे, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे संस्थापक ॲड.प्रदीपसिंह गंगणे, जेष्ठ समाजसेवक गणपत साबणे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधव टोंपे, निळकंठ गंगणे, साईनाथ घोणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश डोंगरे यांनी करताना निलंगा हिंदू खाटिक समाजाच्या वतीने वर्षभर घेण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ॲड.प्रदीपसिंह गंगणे यांनी आपल्या मनोगतात हिंदू खाटिक समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणाबाबत महत्वपूर्ण माहिती विषद केली. यासोबतच अनुसूचित जातीतील अ,ब,क,ड वर्गीकरणाबाबत लवकरच समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती दिली. समाजातील बालविवाह रोखणे सामाजिक कर्तव्य असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रमोद हातांगळे यांनी समाजातील युवकांनी समाज कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक श्रीमती रत्नमाला हातांगळे, गौरव आर्य यांनी केले तर आभार प्रकाश डोंगरे यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने हिंदू खाटिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी हिंदू खाटिक समाज निलंगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!