पिंपरी चिंचवड : येथील माजी नगरसेवक रवि लांडगे आज (दि. २०) आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. रवि लांडगे हे युवा मोर्चाचे अध्यक्ष ही राहिलेले आहेत. आज ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार आहेत.
भाजपात झालेल्या अंतर्गत मतभेदांनंतर रवी लांडगे यांनी भाजपाला रामराम केला. महापालिकेनंतर आता रवि लांडगे हे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने ते ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. पण रवि लांडगे यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याने पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे गटाची ताकदही वाढणार आहे. उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपाचे आ.महेश लांडगे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.