मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर : येथील गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर आयोजित महाअधिवेशन रविवारी (दि. २५) रोजी सकाळी दहा वाजता दयानंद सांस्कृतिक सभागृह बार्शी रोड लातूर येथे संपन्न होणार आहे. या महाअधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सुखदेव गिरी कोल्हापूर हे असणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून अविनाश भारती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचे अनिल पुरी यांनी प्रसिद्धी पञकात दिली. या महाअधिवेशनात गुरुवर्य ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेश बन, नागपुर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या महाधिवेनात इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व राज्यस्तरीय मोफत वधू – वर परिचय मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या महाधिवेशनाला गोसावी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.