लहान मुलांतील भांडणाच्या कारणावरून मारहाण ; दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा 

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

निलंगा / साईनाथ घोणे : लहान मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी मौजे बेवनाळ (ता. शि.अनंतपाळ) येथील दोघांना निलंगा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर डी खराटे यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे बेवनाळ (ता. शि.अनंतपाळ) येथील फिर्यादी शोभा दिलीप शिंदे या घरात असताना आरोपी १) गंगाधर मुकिंदा शिंदे व २) कमल गंगाधर शिंदे यांनी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी शोभा दिलीप शिंदे यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढले. यानंतर आरोपी १ याने फिर्यादीस शिवीगाळ करून आपल्या हातातील कत्तीने मारहाण करून जखमी केले तर आरोपी क्र. २ यांनी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अर्चना शिंदे व सुनीता शिंदे यांना भांडण करून मारहाण केल्याची घटना २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुरनं १०/२०१४ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार पी.जी.स्वामी यांनी केला. या खटल्याचे कामकाज निलंगा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर डी खराटे यांच्यासमोर झाले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता आनंद एन.अनसरवाडेकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. त्यांना पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, महिला पोलीस अंमलदार ए. जी. कांबळे यांनी मदत केली.

याप्रकरणात साक्ष आणि पुराव्याच्या आधारावर प्रथम न्यायदंडाधिकारी श्रीमती आर डी खराटे यांनी १) गंगाधर मुकिंदा शिंदे व २) कमल गंगाधर शिंदे या दोघांना दोषी धरून कलम ४५२ प्रमाणे आरोपीस सश्रम कारावासाची ०१ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी १०००/- रुपये दंड व कलम ३२४ मध्ये ०६ महीन्याची शिक्षा व प्रत्येकी १०००/- रुपये दंड व कलम ३२३ मध्ये ०३ महीन्याची शिक्षा व प्रत्येकी ५००/- रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!