प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

पुणे / सुनील कांबळे : रावेत येथील स्व.बाजीराव बाबुराव भोंडवे पाटील विरंगुळा केंद्र, घोरावडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, युवा मंच,महिला मंच चा प्रथम वर्धापन दिन रविवारी (दि.१) रोजी साजरा करण्यात आला.

यावेळी आ.उमाताई खापरे, आ.अमित गोरखे, माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेविका संगीताताई भोंडवे, माजी महापौर संजोग वाघीरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक नामदेव ढाके, माजी नगरसेवक प्रकाश बाबर, स्व.बाजीराव बाबुराव पाटील विरंगुळा केंद्र संस्थापक अध्यक्ष सुरेश भोंडवे पाटील, भाजपाचे दिपक भोंडवे, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, जेष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड अध्यक्षा श्रीमती वृषालीताई मरळ, श्रीमती वत्सलाबाई भोंडवे, रावेत गावचे माजी सरपंच बाळासाहेब भोंडवे पाटील, संत तुकाराम साखर कारखाण्याचे माजी चेअरमन मधुकर भोंडवे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र तरस, साखर कारखाना संचालक तानाजी भोंडवे, उद्योजक नंदकुमार भोंडवे, भाजप रावेत-काळेवाडी मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, फुले-शाहु-आंबेडकर विचार मंच अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, पोलीस पाटील निघोजे राहुल फडके, गजानन लोकसेवा सह.बॅक अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक वसंतराव काळभोर, अंकुश भोंडवे, विनोद सावंत, प्रकाश भोंडवे, युवा मंच प्रमुख प्रकाश पवार, कुणाल भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सतीशआप्पा बाजीराव भोंडवे पाटील हे होते. या वर्धापन सोहळ्याप्रसंगी सकाळी सत्यनारायण पुजा व ज्येष्ठ महिलाच्या वतीने भजन- आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिवट्टे सर, विकास नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डोईफोडे सर, संभाजीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष थोरात सर,जेष्ठ महिला मंडळ व रावेत गावातील ग्रामस्त आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर आपले मनोगतव्यक्तकरत जेष्ठ नागरिकांस व वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बाळासो शेंडे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडु पवार, जयंत कुंटे, वसंतराव येवले,  नानासाहेब शिंदे,  उत्तमराव पाटील, संपत माळी, पांडूरंग पनाळकर, काटकर, ॲड. जनार्दन दहातोंडे, शाहु खरात, शाहुराज खदीरे, भारती सर, रोकडे सर, श्रीवास्तव सर आदीनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!