साईनाथ घोणे
लातूर : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आयकॉन हॉस्पिटलचे डॉ.प्रमोद घुगे यांना सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दयानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, खा.डॉ.शिवाजी काळगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ.प्रमोद घुगे यांना पत्रकार संघाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. लातूर येथे कार्यक्रमात हा पुरस्कार डॉ.प्रमोद घुगे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यु.डी.गायकवाड यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले. आभार महादेव डोंबे यांनी मानले.