भव्य रामलीला कथेला बाभळगाव येथे प्रारंभ 

2 Min Read

लातूर / साईनाथ घोणे : तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील श्री व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर दसरा महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज यांच्या मंत्रमुग्ध रामलीला कथेला विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार (दि.३) रोजी सायंकाळी प्रारंभ झाला. बाभळगाव येथे दसरा महोत्सवानिमीत्त नवरात्र महोत्सव समिती, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, तंटामुक्ती ग्राम समिती व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विष्णुदास धायगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़

रामलीला कथेत पहील्यादिवशी श्री गणेश पुजन, श्री हनुमान पुजन, नारदमोहभंग संपन्न होऊन ही रामलीला शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी मेघनाथ वध, रावण वध, भरत भेट, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम राज्याभिषेक सादर करुन संपणार आहे.

श्री भुवनेश्वर वशीष्ठजी महाराज रामलीला सादर करत आहेत, यामध्ये ३० पेक्षा अधिक कलावंत आहेत. स्वामी भुवनेश्वर वशीष्ठजी यांची रामलीला केवळ एक कथा नाही, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे. महाकाव्य रामायणातील एक-एक प्रसंग पुढे सरकत गेला़ ते पाहताना आणि ऐकताना उपस्थित ग्रामस्थ भारतीय संस्कृतीच्या दर्शनाचे धन्य झाले़ होते. या रामलीला कार्यक्रमाचा सर्व भावीकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नवरात्र महोत्सव समिती बाभळगाव, अध्यक्ष, जीवनराव गुंडेराव देशमुख, ग्रामपंचायत सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसपंच गोविंद देशमुख, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन महादेव गंगाराम जटाळ, व्हा. चेअरमन शिवाजी आप्पाराव जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवराज नागोराव देशमुख व ग्रामस्थ बाभळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

माजी मंत्री आ.अमित देशमुख यांचा शुभ संदेश

बाभळगावात रामलिला कथेस सुरुवात झाली़ दरम्यान माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी रामलिला कथेस शुभ संदेश पाठवला़ तो संदेश माणिक सगर यांनी वाचला़ भारतीय महाकाव्यांतील रामायण हे प्रसिद्ध ऋषी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. कथेच्या आयोजनातून रामलिला कथेचे विविध भारतीय मुल्य नव्यापिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे, असे शुभसंदेशात नमुद केले होते़.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!